Local Train Block : लोकल प्रवाशांसाठी (Local Train) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला असून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दिनांक 23 ते 26 मार्च असा चार दिवसांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी प्रवास शक्यतो टाळावा. 


खरंतर, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. अप लूप लाईनचा 714 मीटर वरून 756 मीटरपर्यंत विस्तार केल्या जाणार आहे. याबरोबरच गतीवाढीकरीता यार्ड पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी नॉन इ़टरलॉकिंग कार्य तसेच इतर काही गोष्टींसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. याचा काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा प्रमाणात परिणाम होणार आहे. पुढील 26 मार्चपर्यत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द राहणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे विभागाने केले. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणार आहेत असंही रेल्वे प्रशासनाकडू सांगण्यात आलं आहे. 


'या' गाड्या राहतील रद्द.. 


# मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणारी 11113 क्रमांकाची देवळाली ते भुसावळ मेमू गाडी... 
# 11114 क्रमांकाची भुसावळ ते देवळाली मेमू गाडी... 
# 01212 क्रमांकाची नाशिक ते बडनेरा मेमू गाडी.. 
# 01211 बडनेरा ते नाशिक मेमू या क्रमांकांच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द असणार..


हे ही वाचा :


Nagpur Violence : पहार, हातोडा अन् बुलडोझर पोहोचला... नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानचं घर तोडणार, घरच्यांनी अगोदरच बोजाबिस्तरा आवरला