मुंबई : प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दिग्गजांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?, दिग्गजांच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही एबीपी माझाने प्रयत्न केला आहे.

मुंबईत आज 'व्हिजन पुढच्या दशकाचं' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत?, तसंच विरोधकांनाही नेमका कसा विकास हवा आहे हे एबीपी माझाने जाणून घेतलं.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, उद्योजक आणि कलाकार मंडळींनी व्हिजन मांडलं.

सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आपलं व्हिजन मांडलं. कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण विकासकामं थांबणार नाहीत, त्यासाठी वेगळा प्लॅन तयार आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ह्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार अशोक चव्हाण सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. मुख्यमंत्र्यांनी सरकारची सकारात्मक बाजू सांगितली, पण शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातच का होतात?’ असा सवाल विचारत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली.

तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

दुसरीकडे सत्तेत भागीदार असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. राज्याचं व्हिजन ठरवण्याऐवजी मुख्यमंत्री निवडणुकांच्या राजकारणात मश्गुल आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्य सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. "जिथे पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतीसाठी पाणी मिळत नाही, तिथे तुम्ही शौचालयं बांधा सांगत आहात. मराठवाड्यात साधारणपणे 900 ते 1000 फूट खोलीवर पाणी लागत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पुढील 15 ते 20 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल,” असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्हिजन




आणीबाणीच्या वेळी संपादक, पत्रकार, साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली, पण आज ठाम भूमिका घेत का नाहीत?: राज ठाकरे

काँग्रेस सरकार थापा मारायचं, पण हे सरकार आणखी थापा मारतं : राज ठाकरे

स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे : राज ठाकरे

'लोकराज्य' मासिक हिंदी आणि गुजरातीमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी : राज ठाकरे

हिंदी भाषेची जबाबदारी कशासाठी? हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही : राज ठाकरे

पुढील 15 ते 20 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट होईल : राज ठाकरे

पाण्याची सोय नाही, शौचालयं बांधून काय करणार? पाण्याची सोय करा मग शौचालयाची स्वप्न दाखवा : राज ठाकरे

सरकार जाहिरातीवर अमाप खर्च करतंय : राज ठाकरे

शिवसेना खासदार संजय राऊत याचं व्हिजन




येत्या दहा वर्षात महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता असेल आणि उद्धव ठाकरेंकडे नेतृत्त्व असेल : संजय राऊत

अदृश्य हात दोन्ही बाजूला असतात, सत्ताधारी आणि विरोधकांकडेही असतात: संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा अभ्यास करावा : संजय राऊत

राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील संपाचे प्रकार वाढले : संजय राऊत

निवडणूक जिंकण्यासाठी सरकार चालवायचं नसतं, आपले मुख्यमंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत : संजय राऊत

इतर राज्याचे मुख्यमंत्री इथले उद्योग त्यांच्याकडे नेत आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सजग राहायला हवं : संजय राऊत

दुर्दैवाने आज महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य नाही : संजय राऊत

सामान्य लोकांसाठी शिवसेनेची सरकारवर टीका, बाळासाहेबांचा युती सरकारवरही वचक होता : संजय राऊत

आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, पण टीका करणारे घरातच असावेत : संजय राऊत

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं व्हिजन




 

आई-वडील आणि सासू-सासरे सोडून मला कोणाचीही भीती नाही, केंद्र सरकार काहीही करु म्हणत असेल तर त्यांनी काहीतरी करावं, हे माझं म्हणणं आहे : सुप्रिया सुळे

महिला सुरक्षेबाबत ठोस धोरण करायला हवं : सुप्रिया सुळे

महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हायल हवं : सुप्रिया सुळे

ठिबक सिंचन आणि पाण्याच्या उपलब्धतेवर काम गरजेचं : सुप्रिया सुळे

आत्महत्यामुक्त आणि कुपोषणमुक्त महाराष्ट्र व्हायला हवं : सुप्रिया सुळे

शिक्षण क्षेत्रात भरीव काम होणं गरजेचं : सुप्रिया सुळे

स्वच्छतेची सुरुवात दिल्लीतून नाही, तर 17 वर्षांपूर्वी आर आर पाटील यांनी सुरु केली : सुप्रिया सुळे


काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं व्हिजन




राज्यात जातीय सलोखा निर्माण करणं गरजेचं : अशोक चव्हाण

तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होणं आवश्यक : अशोक चव्हाण

समृद्धी महामार्गाचा अट्टाहास कशाला? आधीच्या हायवेचं रुंदीकरण करा,नव्याने जमीन अधिग्रहित करण्याची गरज काय?: अशोक चव्हाण

योजनांचा निधी तळागाळापर्यंत पोहोचायला हवा : अशोक चव्हाण

समन्यायी पाणीवाटपावर विचार होण्याची गरज : अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर सपोर्ट प्राईज वाढवण्याची गरज : अशोक चव्हाण

आयात निर्यातीचा समतोल राखणं गरजेचं : अशोक चव्हाण

शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेला : अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्हिजनमध्ये सरकारची सकारात्मक बाजू सांगितली, पण सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात का होतात? : अशोक चव्हाण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन




तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख होणार : मुख्यमंत्री

सर्वात जास्त  मनुष्यबळाचा आपला देश : मुख्यमंत्री

शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी :  मुख्यमंत्री

शाश्वत शेतीसाठी पाण्याचं नियोजन आवश्यक : मुख्यमंत्री

राज्यात 80 टक्के जमीन कोरडवाहू : मुख्यमंत्री

गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवायला हवा : मुख्यमंत्री

शेतीला सेवाक्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

शेती आणि उद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

उद्योग क्षेत्रात दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक : मुख्यमंत्री

कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार, पण विकासकामं थांबणार नाही, त्यासाठी वेगळा प्लॅन तयार : मुख्यमंत्री

कर्जमाफीनंतरही शेती क्षेत्रातील गुंतवणुकीचा ट्रेण्ड थांबणार नाही, हे माझ्यासमोरील आव्हान : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांसाठी कोणाशीही चर्चा करण्यासाठी तयार : मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम लवकरच सुरु होईल : मुख्यमंत्री

आजवरची सर्वाधिक भरपाई समृद्धी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येईल : मुख्यमंत्री

या प्रकल्पात आम्ही शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानभरपाई देत आहोत, हे मी दाव्याने सांगतो : मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर हायवेसाठी शेतकऱ्यांशी चर्चा, संवाद करुनच जमीन अधिग्रहित करणार : मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांना फायदा : मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचा फायदाच : मुख्यमंत्री

सध्यातरी दिल्लीला जाणारा माझा प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही प्लॅन ऐकीवात नाही : मुख्यमंत्री

झोटिंग समितीतील शिफारसी इथे सांगितल्या तर माझ्यावर हक्कभंग येईल : मुख्यमंत्री

145चं गणित मला हे मीडियाच्या माध्यामातूनच समजलं : मुख्यमंत्री

शिवसेना आणि भाजप पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू : मुख्यमंत्री

भाजप आणि शिवसेनेमध्ये कधीकधी कुरबुरी होतात. पण 5 वर्ष आमचं सरकार टिकणार आहे : मुख्यमंत्री

ह्या सरकारला कुठलाही धोका नाही, कोणताही भूकंप होणार नाही : मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

व्हिजन पुढच्या दशकाचं : संजय राऊत यांचं व्हिजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं : राज ठाकरे यांचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

अदृश्य ‘हात’ दोन्ही बाजूकडे असतात : संजय राऊत

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री

सध्यातरी दिल्लीत जाण्याचा प्लॅन नाही : मुख्यमंत्री