CCTV : अंधेरीतील मरोळ परिसरात शिरलेला बिबट्या जेरबंद, डार्ट मारुन केलं बेशुद्ध
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2019 01:44 PM (IST)
सध्या हा बिबट्या वुड लँड इमारतीच्या जिन्याखाली लपून बसलेला आहे. घटनास्थळी वनाधिकारी आणि पोलीस दाखल झाले असून या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
मुंबई : अंधेरी येथील मरोळ पोलीस वसाहतीजवळ असलेल्या वुड लँड इमारतीत शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. साडे चार तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद करण्यात आला. दुसऱ्या मजल्यावर लपून बसलेल्या बिबट्याला डार्ट मारुन केलं बेशुद्ध करण्यात आलं. आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मरोळ परिसरात एक बिबट्या निर्दशनास आला होता. हा बिबट्या मनुष्यवस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बिवट्याचा वावर परिसरातील कॅमेऱ्यासुद्धा कैद झाला आहे. मरोळ भागात मोठी मनुष्यवस्ती आहे. हा बिबट्या वुड लँड इमारतीच्या जिन्याखाली लपून बसलेला होता. अखेर घटनास्थळी वनाधिकारी आणि पोलीस दाखल झाले. त्यांच्या या प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात आला. VIDEO | अंधेरीतील मरोळजवळ इमारतीत बिबट्या शिरला | मुंबई | एबीपी माझा परिसरात बिबट्याच्या वावर असल्याची माहिती मिळताच या इमारतीच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या वसाहतीपासून काही अंतरावरच संजय गांधी नॅशनल पार्कचे जंगल आहे. हा बिबट्या याच जंगलातून भक्ष्याच्या शोधत आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.