मुंबई: शिवसेनेपुढे ज्या पद्धतीनं मनसेच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं होतं त्याच पद्धतीनं आज सुद्धा मनसेनं केलेल्या एका विनंतीकडे शिवसेनेनं दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिवसेना-मनसेमधील संबंध आणखी दुरावले आहेत. मनसेची उद्याची शेवटची प्रचारसभा दादरमधील दत्ता राऊळ मैदानावर होऊ द्यावी, अशी विनंती शिवसेनेकडे केली होती. पण याबाबत शिवसेनेकडून मनसेला अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.


मनसेची उद्याची शेवटची प्रचारसभा दादरमधील दत्ता राऊळ मैदानावर होऊ द्यावी, अशी विनंती मनसेने शिवसेनेकडे केली होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते सदा सरवणकर यांना विनंती केली होती. पण याला कोणतही उत्तर शिवसेनेकडून देण्यात आलेलं नसल्यानं मनसेची सभा उद्या कबुतरखान्याजवळच होणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली.

 

काय आहे प्रकरण?

दादरमधील दत्ता राऊळ मैदान हे शिवसेनेने आधीच बूक केलं आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्याची शेवटची सभा बीकेसीमधल्या एमएमआरडीए मैदानावर आहे. मग असं असताना शिवसेनेला दोन्ही मैदानं कशासाठी असा सवाल करत, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर आक्षेप घेतला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी शिवसेनेनं दादरमधलं दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला.

 

शिवसेनेचा दावा

मात्र, शिवसेनेने हे मैदान दोन-चार दिवसात नव्हे तर खूप आधीच बूक केलं आहे. त्यामुळे कधीही झोपेतून उठून मैदान मागणाऱ्यांना का देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी घेतली होती.

तसंच उद्धव ठाकरेंची सभा बीकेसी मैदानावर असली, तरी दत्ता राऊळ मैदानावर शिवसेनेचे इतर नेते सभा घेणार असून, ते मैदान आपण आधीच आरक्षित केल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

संबंधित बातम्या:

मनसेची शिवसेनेला आणखी एक विनंती

राज ठाकरेंच्या दादरमधील सभेचं ठिकाण ठरलं!

दादर मैदानावरुन शिवसेना-मनसे आमने-सामने


फडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील : आदित्य ठाकरे

‘सामना’वर बंदी घालू देणार नाही : व्यंकय्या नायडू