Leander Paes : भारताचा प्रसिद्ध टेनिसस्टार लिएंडर पेसनं आपली लिव्ह इन पार्टनर आणि मॉडेल रिया पिल्लईचा कौटुंबिक छळ केला आहे, असा ठपका मुंबईतील वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं ठेवला आहे. त्यानुसार रियाला दर महिना दिड लाख रुपये पोटगी देण्याचे आदेशही न्यायालयानं लिएंडर पेसला दिले आहेत.


महानगर दंडाधिकारी कोमलसिंह राजपूत यांनी काही दिवसांपूर्वी रियानं यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवर आपला निकाल दिला आहे. या निकालंच निकालपत्र नुकतंच उपलब्ध झालं आहे. त्यानुसार न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार, पेसनं रियाला दरमहा एक लाख रूपये खर्चासाठी पोटगी म्हणून द्यावेत आणि घरभाडे म्हणून पन्नास हजार रुपये वेगळे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जर रियानं त्याच्याच घरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर घरभाड्याचे 50 हजार रूपये तिला मिळणार नाहीत, असंही न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे.


रियानं लिएंडर पेसच्या विरोधात साल 2014 मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होता. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जवळपास आठ वर्षे एकत्र राहत होते. मात्र या दरम्यानं लिएंडरनं रियाचा वारंवार शाब्दिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ केला आणि तिला प्रचंड त्रास दिला आहे, अशी तक्रार रियानं केली आहे. रियानं केलेल्या या तक्रारीमध्ये तथ्य आहे, लिएंडरने रियाचा विविध प्रकारे छळ केला आहे, असे निरीक्षण न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलं आहे.


मात्र रियाच्या पहिल्या लग्नाच्या परिस्थितीबाबत आपल्याला माहिती नव्हती, असा दावा पेसच्यावतीनं करण्यात आला. अभिनेता संजय दत्तसह तिचा पहिला विवाह झाला होता, मात्र कालांतरानं त्यांनी घटस्फोट घेतला होता. यादरम्यान रिया आणि लिएंडर हे लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. रियापासून झालेल्या पेसने मुलीचा ताबा मिळावा म्हणून वांद्रे कौंटुबिक न्यायालयात स्वतंत्र दावा दाखल केला आहे. तसेच रियाचे एका महिलेशी संबंध असल्याचा आरोप लिएंडर पेसनं कोर्टात केला आहे. 


हे ही वाचा  



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha