ठाणे : ठाण्यातील अक्षत मोहिते या अकरावी इयत्तेतील तरुणाच्या सॅक्झीमो (Psaximo) या अंतरीक्ष प्रकल्पाची अमेरीकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल स्पेस सोसायटीने दखल घेतल्यानंतर, अक्षतवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम एबीपी माझाने दिले होते. त्याची दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अक्षतचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अक्षतच्या प्रकल्प सादरीकरणासाठीच्या अमेरिका वारीसाठीचा संपूर्ण खर्च उचलला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे राहणारा अक्षत सध्या मुलुंड येथील महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकतो. शालेय शिक्षण घेत असताना ‘अंतराळ’ विषयावर पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमधील सहभागानंतर संशोधन करून त्याने अंतरीक्ष प्रकल्प बनवला. या प्रकल्पाची थेट नासाने दखल घेतली तसेच, या प्रकल्पाचे सादरीकरण 24 ते 27 मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्समध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत करण्यासाठी निमंत्रण धाडले. याठिकाणी जगभरातून स्पर्धक येणार असून, भारतातून केवळ 4 मुलांची निवड करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे.
अक्षतच्या या अमेरिका वारीसाठी भरमसाठ खर्च होणार असल्याने त्याच्या पालकांसमोर मोठा पेच उभा राहिला होता. याबाबतचे वृत्त प्रदर्शित होताच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अक्षतचा जाहीर सत्कार केला.
तसेच, अक्षतच्या अमेरिकेला जाण्यायेण्यापासूनचा सर्व खर्च आमदार सरनाईक यांनी उचलला आहे. यामुळे अक्षतच्या नासा वारीला मोठे पाठबळ मिळाले आहे.
काय आहे प्रकल्प?
स्पेसरुपी शहरामध्ये रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज सौर उर्जा आणि मायक्रोव्हेवद्वारे निर्माण केली जाणार आहे. इंधनासाठी दोन इलेक्ट्रोन यांच्या संयोगातून इंधन निर्मिती केली जाणार आहे. हे स्पेस अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्राजीन या इंधनाचा वापर केला जाणार आहे. तर इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच लायफाय हे तंत्र स्पेसमध्ये वापरले जाणार आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यातील अक्षत मोहितेचा ‘नासा’वारीचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 May 2018 09:24 PM (IST)
भारतातून केवळ 4 मुलांची निवड 'नासा'कडून करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -