मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी कोटीच्या कोटी दान अर्पण करण्यात आलं आहे. सात दिवसानंतर लालबागच्या राजाच्या दानपेटीत 4 कोटी रोख रक्कम जमा झाली आहे.


इतकंच नाही तर तब्बल 99 लाख रुपयांचं 3 किलो 200 ग्राम सोनं आणि 23 लाखाची 48 किलो चांदी हुंडीत दानरुपी जमा झाली आहे.

खजीनदार महेश जाधव यांनी याबाबतची माहिती दिली.

केवळ देशी चलनच नाही तर परकीय चलन, सोने-चांदीच्या भेटवस्तूही बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. बाप्पांचे चरण, हार, मुकूट, उंदीर, बजरंगी भाईजानची सोनसाखळी असे विविध दागदागिने अर्पण करण्यात आले आहेत.

हे दागिने लिलावानंतर पुन्हा भक्तांकडेच जाणार आहेत. या दागिन्यांचा लिलाव 19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजवर होणार आहे. यामध्ये कोणीही भाविक यामध्ये सहभागी होऊ शकतो.

संबंधित बातम्या

'लालबागचा राजा'च्या चरणी चारच दिवसात कोट्यवधींचं दान