Lalbaugcha Raja, मुंबई : लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे. सलग दोन दिवसांच्या सुट्टी असल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचा पाहायला मिळाली. गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढली. भाविकांना धक्काबुक्की,मानगुटीला धरून बाजूला फेकणे. भाविकांसोबत हाडामारी असे प्रकार अजूनही लालबागचा राजाच्या मंडळात सुरू आहेत. लालबागचा राजाचा मंडळात कार्यकर्त्यांकडून गणेश भक्तांच्या सोबत दिला जाणारा वागणुकीसंदर्भात काही व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकलला जात असल्याचा आपण बघितला आहे. अजूनही तीच परिस्थिती लालबागचा मंडळात दिसून येत आहे.


मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल 


आता लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आला आहे. लालबाग राजाच्या चरणी सामान्य माणसांना दिला जाणारा चुकीचा वागणुकीसंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल करण्यात आला आहे.


वकील पंकज मिश्रा यांची पोलिसात तक्रार 


वकील आशिष राय आणि वकील पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून लालबागचा राजा मंडळाचे विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून गणेश भक्तांना दिला जाणारा चुकीचा वागणुकीचा संदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.


भाविकांसोबत अभिनेत्रीलाही धक्काबुक्की 


लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यावर्षी एका बाजूला सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की केली जात होती तर दुसऱ्या बाजूला उद्योगपती, सेलिब्रिटी लोकांना फोटो सेशनसह दर्शन दिले जात होते. लालबागचा राजाच्या मंडळाने यावर्षी VIP दर्शनाचा पॅटर्न राबल्याचं चित्र दिसून आलं होतं. शिवाय एका अभिनेत्रीलाही महिला बाऊंसरांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीने याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट करत खंत व्यक्त केली. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Lalbaugcha Raja : 'लालबागचा राजा'ला एकीकडे व्हीआयपी दर्शनाची रीघ, दुसरीकडे बॉलिवुड कलाकार सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शनाला; पाहा व्हिडीओ