Lalbaug Accident News : मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) आणि लालबाग (Lalbaug) म्हणजे, एक समीकरण. बाप्पाच्या आगमनापासून ते अगदी विसर्जनापर्यंत लालबाग गजबजलेलं असतं. अशातच रविवारी बाप्पाच्या आगमनाच्या धामधुमीत लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात भीषण अपघात (Accident Updates) झाला आहे. बेस्ट बसनं (BEST Bus) तब्बल 9 प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 


गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे लालबागमध्ये मोठी गर्दी होती. त्यात अनेक मंडळांचे आगमन सोहळेदेखील सुरू होती. अशातच बेस्टची 66 क्रमांकाची बस अनिंत्रित झाली आणि 9 प्रवाशांना उडवलं. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात 9 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती अजून चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 


मद्यधुंद प्रवाशामुळे मुंबईत लालबाग परिसरात बस अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. लालबागमध्ये काल रात्री घडलेल्या अपघातात 66 नंबरच्या बेस्ट बसनं 9 जणांना धडक दिली. बस अनियंत्रित झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये मद्यधुंद प्रवाशानं चालकासोबत वाद घातला आणि नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 


नेमकं काय घडलं? 


बेस्ट प्रशासनाची 66 क्रमांकाची बस राणी लक्ष्मीबाई चौक सायन इशून बॅलार्ड पियरच्या दिशेनं जात होती. या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. एक मद्यधुंद प्रवासी चालक आणि वाहकासोबत वाद घालत होता. त्यानंतर या मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरला ओढलं आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. मद्यपान केलेला प्रवासी दत्ता शिंदे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.  


अपघातानंतर बेस्ट प्रशासनानं काय सांगितलं? 


बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, 66 क्र क्रमांकाची (Electra) बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेनं जात असताना गणेश टॉकीजच्या दरम्यान एका दारुड्या प्रवाशानं वाहकाबरोबर झटापट केली. त्यानंतर वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेनं गेली. या दरम्यान, फुटपाथवरुन जाणारे काही पादचारी जखमी झाल्याचं समजलं आहे. पोलिसांनी बसमधील दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. त्यासोबतच, वाहक आणि चालक यांना काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. आतापर्यंत एवढीच माहिती मिळाली असून सविस्तर माहिती नंतर कळवण्यात येईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Lalbaug Bus Accident: मद्यधुंद प्रवाशानं बेस्टच्या ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं, अन्...; लालबागमधील भीषण अपघातात 9 प्रवासी गंभीर