कल्याण: पतीसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून महिलेनं 2 मुलांसह विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेत आईसह 2 मुलांचा मृत्यू झाला असून आणखी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.
कल्याणच्या मोहने परिसरातल्या लक्ष्मी वाघे या महिलेनं 3 मुलांसह विष प्राशन केलं. यात 10 वर्षांची मुलगी नाजुका आणि 7 वर्षांचा मुलगा वंशचा मृत्यू झाला आहे. तर 12 वर्षांच्या विशालवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे.
लक्ष्मी यांचा पती सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्यावर मुलांना विष पाजलं आणि स्वत:ही विष प्राशन केलं. पती घरी परतल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.