राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध रिझर्व बँकेकडून शिथील
एबीपी माझा वेब टीम | 27 Oct 2016 05:18 PM (IST)
मुंबई : राज्यातील सहकारी बँकांवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने उठवले आहेत. तसंच राज्याच्या सात शहरांमध्ये राज्य सहकारी बँकांच्या शाखा उघडण्यास परवानगीही दिली आहे. रिझर्व्ह बँकेने राज्यातील सहकारी बँकांवर मार्च 1996 पासून 11 प्रकारचे निर्बंध लादले होते. ते निर्बंध आता रिझर्व्ह बँकेने उठवले आहेत. तसंच पुणे, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि धुळे या सात शहरात राज्य सहकारी बँकेच्या शाखा काढण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणामुळे राज्यातील सहकारी बँकांच्या विस्ताराला मदत होणार आहे.