नवी मुंबई : नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अमान्य केल्यास, राजीनामा देऊ, असं सुधाकर सोनावणे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव संमत केला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या बाजूने तर भाजपने तुकाराम मुंढेंच्या बाजूने मतदान केलं. आता हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव अमान्य केल्यास, राजीनामा देऊ असं आता सुधाकर सोनावणे यांनी म्हटलं आहे. संबंधित बातम्या 'तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी' आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे