कल्याण : लोकलमध्ये जागेसाठी गुंडगिरी करणाऱ्या मुजोर महिलांन आज कल्याण स्थानकात जीआरपी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. या महिलांवर तक्रारकर्त्या महिलेनं गंभीर आरोप केले आहेत.


काल (बुधवार) डोंबिवलीमध्ये लोकलमध्ये चढलेल्या या महिलेला काही महिला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी लोकलच्या डब्यांमध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन करत 15 ते 20 महिलांना आज अटक केली.

महिलेचा नेमका आरोप काय?

डोंबिवलीच्या या महिलेला काल कल्याण-सीएसएमटी ट्रेनमध्ये काही महिलांकडून मारहाण करण्यात आली.

'मी डब्यात चढल्यानंतर या महिला मला म्हणाल्या की, आमची गाडी आहे यायचं नाही. उद्या इथं आलं तर खबरदार... त्यानंतर त्यानी मला गलिच्छ आणि घाणेरड्या शिव्याही दिल्या. नंतर त्यांनी माझी बॅग फेकून दिली, माझा ड्रेस फाडला, मला ओरबाडलं आणि धमकी दिली की, परत इथं यायचं नाही. ही आमची गाडी आहे.' असा आरोप मारहाण झालेल्या महिलेनं केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी 8.30च्या सुमारास मुबंईकडे जाणाऱ्या एक लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारीची घटना घडली.

कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी (डोंबिली-कल्याण-मुबंई असा प्रवास करण्यासाठी) आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीच्या चारुशीला वेल्हाळ या महिला रेल्वे प्रवाशाला कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी केली. त्याची तक्रार रेल्वे पोलिसात करण्यात आली होती. डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.21ला कल्याणासाठी ही लोकल डाऊनच्या दिशेने धावते. कल्याण स्थानकावरुन हीच लोकल सकाळी 8.36ला सीएसटीसाठी निघते. पण बुधवारी ही लोकल 10 मिनिटं उशिराने पोहोचल्याने गोंधळ झाला. लोकल खचाखच भरून आल्याने कल्याणच्या महिला संतापल्या आणि त्यांनी डोंबिवलीवरुन बसून आलेल्या महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण सुरु केली.

कल्याण रेल्वे स्थानकात आणि बदलापूर मध्ये अशा घटना सातत्याने होत असल्याचं वारंवार निदर्शसनास आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चौथ्या सीटवर बसण्याच्या वादातून एका प्रवाशाचा तिघांशी वाद झाला होता. यावेळी त्याला ट्रेनमध्येच बेदम मारहाण करण्यात आली होती.

VIDEO :



संबंधित बातम्या :

लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 15 ते 20 महिलांना सापळा रचून पकडलं!