मुंबई : गेल्या 14 वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित कुर्ला सबवेचं काम येत्या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2016 पर्यंत कुर्ला सबवेचं काम पूर्ण होईल, असा दावा मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं केला आहे.


माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या कुर्ला सबवेचं काम डिसेंबर 2016 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाच्या अभावी हे काम रखडलं आहे.

2002 पासून प्रस्तावित असलेल्या कुर्ला सबवेच्या खर्चात मात्र तब्बल 4 कोटींनी वाढ झाली आहे. 2002 मध्ये या प्रकल्पाचा खर्च 4.30 कोटी होता. तो आज 9 कोटींच्या घरात पोहचणार आहे. मध्य रेल्वे 2.11 कोटी आणि पालिका 2.94 कोटी असे 5.05 कोटी खर्च करत आहे.