मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मुंबई पोलिसांकडे कोरोना योद्धा म्हणून बघितले जात आहे, मात्र आता मुंबई पोलीस कोरोना योद्धा सोबत लाईफ सेवर म्हणजेच आयुष्य वाचवणारे सुधा बनले आहेत. याचं कारण आहे खार पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी केलेल प्लाज्मा डोनेशन.


मुंबईतील खार पोलीस स्टेशन मधील 6 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला प्लाज्मा डोनेट केला आहे. जेणेकरून कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारामध्ये मदत होईल. खार पोलीस स्टेशनमधील चार अधिकारी आणि 14 कर्मचारी अशा एकूण 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर मात करून आलेल्यांना प्लाज्मा डोनेट करण्याचे आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत खार पोलीस स्टेशन मधील या कर्मचाऱ्यांनी आपला प्लाज्मा डोनेट केला आहे. तर उर्वरित कर्मचारी सुधा प्लाज्मा डोनेट करणार असून लोकांनी सुद्धा प्लाज्मा डोनेट करण्यासाठी पुढे येण्याचा आवाहन खारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबुद्ले यांनी केलं आहे.



देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळाला आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेले मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि मुंबई पोलीस अहोरात्र कोरोनाला लोकांपासून दूर ठेवण्यासाठी सज्ज होते.


कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार करण्यासाठी डॉक्टर रुग्णालयात सज्ज होते. तर लोकांनी विनाकारण घराबहेर येऊन गर्दी करू नये आणि कोरोनाची साखळी मोडता यावी यासाठी पोलीस चौकाचौकात सज्ज होते. लॉकडाऊनमध्ये मुंबईत 199 ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान गुन्ह्यांच्या संख्येमध्येही मोठी घट पहायला मिळाली. तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ही मदत झाली. मात्र आपलं कर्तव्य बजावत असताना पोलीस दलात कोरोना मोठ्या प्रमाणात परसरला.



महाराष्ट्र मध्ये एकूण 5935 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोण्याची लागण झाली ज्यामधील 4715 पोलीस कर्मचारी बरे होऊन घरी गेले. तर 74 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामधील 50 टक्के कोरोना बाधित पोलीस कर्मचारी हे मुंबईतील होते. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लोकांशी जास्त येणारा संपर्क कंटेनमेंट झोनमध्ये ड्युटी अशी अनेक कारणं होती. ज्यामुळे मुंबई पोलीस दलात कोणाचा प्रादुर्भाव वाढत होता. अशा परिस्थितीमध्ये खार पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी कोरोनावर तर मात केलीच मात्र त्यासोबतच प्लाजा डोनेट करुन इतर कोरोना बाधित रुग्णांचे प्राण वाचतील अशी कौतुकास्पद कामगिरीही केली.


खार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार भिवाजी परब यांना सुद्धा करण्याची लागण झाली आणि त्यांच्या घरात त्यांच्या आईलासुद्धा कोरोनाने ग्रासल. भीवाजी यांनी तर कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली पण त्यांच्या आईने कोरोणामुळे आपले प्राण गमावले. आपल्या डोक्यावरचं मातृत्व हिरावलं मात्र इतरांच्या डोक्यावरचं मायेचा हात हिरावू नये यासाठीच भिवाजी परब यांनी प्लाज्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला.


प्लाज्मा डोनेट केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे :

दीपक खराडे (पोलीस उपनिरीक्षक)

अजित वाघ (पोलीस हेड कॉन्स्टेबल)

भीवाजी परब (पोलीस नाइक)

संकेत यादव (पोलीस कॉन्स्टेबल)

अभिजीत घाडिगावकर (पोलीस कॉन्स्टेबल)

मयूर जाधव (पोलीस कॉन्स्टेबल)

खार पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबुद्ले आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची सकारात्मक दखल घेत आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलं तर काबुद्ले यांनी कोरोणावर मात करून आलेल्या लोकांनी पुढे येऊन प्लाज्मा डोनेट करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केलं.

महत्त्वाच्या बातम्या : 

10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात रद्द झाल्यानंतर आता मुंबईत 9 उपायुक्तांच्या बदल्या

कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्यासाठी हायकोर्टात याचिका, राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश