‘आमदार-खासदारांना उपचारात अग्रक्रम द्या’, KEM डीनचा अजब फतवा
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2017 09:27 AM (IST)
मुंबई: एकीकडे देशातील व्हीआयपी कल्चरला फाटा देण्यासाठी पंतप्रधानांनी लाल दिव्यांच्या बत्तीला बंदी घातली. तर दुसरीकडे मुंबईच्या केईएम रुग्णालयाला व्हीआयपी कल्चरची लागण झालेली दिसते आहे. केईएममध्ये 40 जणांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जावी असा अजब फतवा डीन अविनाश सुपेंनी काढला आहे. महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा समावेश आहे. तसंच आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांनाही उपचारात अग्रक्रम देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. डीन अविनाश सुपे यांनी यासाठी एक खास पत्रकच काढलं आहे. या पत्रकात खासदार, आमदार, नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारात अग्रक्रम देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या नव्या फतव्यामुळे इतर रुग्णांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे रुग्णसेवेचं मंदिर समजल्या जाणाऱ्या रुग्णालयातील हा प्रकार नक्कीच लांछनास्पद आहे.