उल्हासनगरमध्ये महिलेला भरदिवसा जिवंत जाळण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2017 10:46 PM (IST)
उल्हासनगर : घरगुती वादातून पतीने महिलेला पेटवून दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. यामध्ये महिला सुमारे 66 टक्के भाजली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास उल्हासनगरच्या ब्ल्यू बेरी लॉज परिसरात ही घटना घडली. घटनेनंतर महिलेला उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सामी शेख असं पीडित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.