कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी, मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 6 हजार 500 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यापैकी एकही रुपया महापालिकेला मिळाला नसल्याचा दावा देवळेकरांनी केला आहे. तसंच ठाणे आणि मुंबईत प्रचार करताना मुख्यमंत्री खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप करत, देवळेकरांनी देवेंद्र फडणवीसांना खोटारडे मुख्यमंत्री अशी उपमा दिली आहे.

राजेंद्र देवळेकर, महापौर, कडोंमपा

‘मुख्यमंत्री नागपूरचे आहे. तिथं संत्र्याची शेती प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवलीप्रमाणे महापालिका निवडणुकीत ठाणे, मुंबईकरांना आश्वासनांचे गाजर दाखवित आहे.’ असं म्हणत  देवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला.