कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत अर्थसंकल्पावर वादळी चर्चा सुरू असताना, बसपा नगरसेविका चक्क मोबाइल गेम खेळण्यात दंग असल्याचं समोर आलं आहे. सोनी अहिरे असं मोबाइल गेम खेळणाऱ्या नगरसेविकेचं नाव आहे.




कल्याण-डोंबिवली महापालिकेत जोरदार चर्चा सुरु असताना नगरसेविका सोनी अहिरे या मात्र, मोबाइल गेम खेळण्यात दंग होत्या. महासभेत अर्थसंकल्पावर वादळी चर्चा सुरू होती. मात्र, दुसरीकडे नगरसेविका सोनी अहिरे या सभागृहात बसून मोबाइलवर गेम खेळण्यात धन्यता मानत होत्या.



महापालिकेच्या परिवहन सेवेबद्दल दोन तासांपासून सभागृहात चर्चा सुरू होती. अनेक नगरसेवक त्याविषयी पोटतिडकीने बोलत होते. अशावेळी अहिरे या मात्र बेजबाबदारपणे मोबाइलवर गेम खेळताना दिसत होत्या. त्यांच्या अशा वागण्यानं कल्याणकर संताप व्यक्त करत आहेत.