कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये बुधवारी कोरोना रूग्णसंख्येचा नवा आकडा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली. बुधवारी कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 392 इतक्या  नव्या कोरोना रुग्णसंख्येने संपूर्ण प्रशासन हडबडून गेलं. 

Continues below advertisement

ऑक्टोबर 2020 म्हणजेच 5 महिन्यांनंतर  इथल्या कोविड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

WB Election 2021 | निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांना दुखापत, पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न 

Continues below advertisement

कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात येणार हे निर्बंध…

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवावीत.

- शनिवार आणि रविवारी पी1-पी2 नूसार दुकाने सुरू ठेवणे

- खाद्यपदार्थ आणि इतर हातगाड्या संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी.

- हॉटेल्स-रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवणे.

- पोळीभाजी केंद्र 9 वाजेपर्यंत सुरू राहणार

- पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार.

- भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणार.

- लग्न- हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोकं नकोत, जास्त लोकं असल्यास गुन्हे दाखल होणार.

- लग्न, हळदी समारंभांना सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी, यादरम्यान सर्वांनी मास्क घातलेच पाहिजेत.

- लग्न आणि हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि वराच्या पित्यासह हॉल व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय.

- होम आयसोलेशनमध्ये असणारे कोविड 19 रुग्ण सर्रासपणे फिरत असल्याचे आढळून आल्यामुळं असून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. असे रुग्ण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

-  महाशिवरात्रीनिमित्त कल्याण-डोंबिवली मधील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद, मंदिर विश्वास्थांचा निर्णय नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये पालिकेचे आवाहन.

- जिम, स्पोर्ट्स क्लब, खेळाची मैदानं, उद्यानं, स्विमींग पूल, वैयक्तिक सरावासाठी सुरु. सामूहिक स्पर्धा, कार्यक्रम बंद. 

- प्रवासी रिक्षांमध्ये 2 पेक्षा जास्त प्रवाशांना परवानगी नाही. 

- जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना अनावश्यक गर्दी होणार नाही यासाठी एका वेळी पाचहून जास्त व्यक्तींची गर्दी नसावी.