कल्याण : स्टेशन परिसरात झोपलेले प्रवासी आणि  लोकल पकडताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. बालाजी मस्सा असे या चोरट्याचे नाव असून त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने  ताब्यात घेतलं आहे. 


या दोघांकडून 14 मोबाईल हस्तगत करण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहेत. या दोघांकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पुढील तपास सुरू आहे 


रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी रेल्वेमध्ये वाढलेल्या चोरी आणि लूटीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच चोरीच्या गुन्ह्यांचे तपास करत होती. एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण ग्रामीण मधील कांबा परिसरात राहणारा बालाजी मस्से हा चोरटा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून कल्याण रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत दाखल आठ गुन्हे उघडकीस आले. तसेच त्याच्याकडून 11 मोबाईल हस्तगत करण्यात आले. तर बालाजी सोबत ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाकडून तीन मोबाईल हसगत करण्यात आले. 


या दोघांकडून आतापर्यंत सुमारे दोन लाख किमतीचे 14 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी अर्शद शेख यांनी दिली. दरम्यान रेल्वे स्थानकावर झोपलेले प्रवाशी आणि लोकल पकडताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत हे दोघे प्रवाशांचा मोबाईल चोरी करायचे. या दोघांकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: