Coronavirus vaccine KDMC : मागील काही दिवसांत कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण तितकंच महत्वाचं आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेत मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. मात्र लाट ओसरताच पालकांनी मुलांच्या लसिकरनाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून येतय . येत्या काही दिवसात शाळा देखील सुरू होत आहेत. त्यातच कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे पालकांनी तत्काळ मुलांचं लसीकरण करून घ्यावे, असं आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय .


गेल्या काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. रुग्णांमध्ये  होणारी वाढ आरोग्य विभगासह नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. शासनाकडून आरोग्य विभाग सज्ज असल्याचा दावा करण्यात येतोय. लसीकरण, बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जातं आहे. मात्र सुरुवातीला रांगा लावणाऱ्या नागरिकांनी वर्षभरानंतर मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीहून दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संभाव्य धोक्याचा विचार करत लहान मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. सुदैवाने तिसरी लाट ओसरली. मात्र लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पालक उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत  12 ते 14 वयोगटातील एकूण 59 हजार 326 मुलांचे लसीकरण करण्याचा टार्गेट देण्यात आले होते. मार्चमध्ये हे लसीकरण सुरू करण्यात आले, साडे तीन महिन्यात यामधील अवघ्या 21 हजार 908 मुलांनी पहिला डोस तर 8 हजार 431 मुलाने दुसरा डोस घेतला. एकंदरीतच 38 टक्के मुलांचा लसीकरनाचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. या वयोगटात लसीकरण वाढवण्यासाठी पालिकेकडून शाळा स्तरावर तसेच घराघरांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली. मात्र शाळा बंद असल्याने लसीकरण वेगाने झाले नसल्याचा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. केडीएम्सीच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी लसीकरण वाढवण्यासाठी शाळासह ,घराघरांमध्ये देखील जनजागृती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दीली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. पालकांनी देखील मुलांचं लसीकरण करून घ्यावं अस आवाहन केलंय. 


वयोगट 12 ते 14 : ( 12 मार्च 2022 पासून लसीकरण सुरू )


टार्गेट : 59,326
पहिला डोस : 21,908 ...36.93 %
दुसरा डोस : 8,431 ...38.48%


वयोगट 15 ते 17 ( 03 जानेवारी 2022 पासून लसीकरण सुरू)


टार्गेट : 92,602
पहिला डोस -55,472 ....59.90 %
दुसरा डोस - 40,786 .... 73.53%


सर्वमान्य गटातील लसीकरण
एकूण टार्गेट :- 13,97,138
पहिला डोस -12,40,386 ....  93.60%
दुसरा डोस - 11,16,543 ..... 77.76%
बूस्टर डोस - 53,523