कल्याण : कोविडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले होते. मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीचाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आला असून प्रशासनाने यासंदर्भातील नवीन आदेश नुकतेच जारी केले आहेत. 

Continues below advertisement

या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाही. 

Maharashtra Pune Lockdown : पुण्यात पुन्हा निर्बंध कडक, सोमवारपासून नियम बदलणार, आदेश जारी- काय सुरु, काय बंद

Continues below advertisement

कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकानेही सायंकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के सायंकाळी 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. 

Maharashtra Unlock : संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू, नवी नियमावली जारी 

खाजगी कार्यालयेही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयेही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत. सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.