कल्याण स्टेशनवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला बेड्या
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 03:44 PM (IST)
कल्याण : रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आलंय. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरची ही थरारक दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून रेल्वे प्रवाशांना लुटण्याचा फंडा या टोळीनं अवलंबला होता. पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. विशाल तायडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. विठ्ठलवाडी स्थानकात मध्यरात्री या टोळीची अन्य तरुणांशी झटापट सुरु झाली. त्यावेळी धारदार शस्त्रानं हल्ला करुन लूट करण्यात आली