कल्याण : पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या कारमधून 50 हजारांची रक्कम चोरल्याची घटना बदलापुरात घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
बदलापूरच्या बेलवली भागात राहणारे रोहित कराळे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आपटेवाडी भागातून कारनं जात होते. त्यावेळी एका दुचाकीस्वारानं त्यांना गाडी पंक्चर असल्याचं सांगितलं. त्यामुळे कराळे यांनी समोरच असलेल्या पंक्चरच्या दुकानात गाडी थांबवली.
पंक्चर तपासण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले आणि पंक्चरवाल्याकडे गेली. त्यावेळी त्यांच्यासमोरच असणाऱ्या चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून गाडीतले 50 हजार रुपये चोरुन नेले. बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंक्चर काढायला उभ्या कारमधून 50 हजारांच्या रकमेची लूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2017 08:50 PM (IST)
पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या कारमधून 50 हजारांची रक्कम चोरल्याची घटना बदलापुरात घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -