मुंबई: मुंबईतल्या खड्ड्यांमुळे न्यायमूर्तींना पाठदुखीचा त्रास होत असेल, तर सरकरानं न्यायमूर्तींना अलिशान गाड्या द्याव्यात, असा अजब युक्तीवाद मुंबई महापालिकेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी खड्ड्यांमुळे पाठदुखी होत असल्याची टिप्पणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी हा युक्तीवाद केला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी फक्त मुंबई पालिकेच्या अभियंत्यांना जबाबदार धरणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी कोर्टात सांगितलं.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी 2014 मध्ये पत्र लिहून हायकोर्टाला मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत हायकोर्टानं सुमोटो अंर्तगत याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी सुरु असताना मुंबई महापालिकेनं हा युक्तीवाद केला आहे.