मुंबई: मेट्रो 5ला दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर आज कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तळोजा-डोंबिवली-कल्याण असा मेट्रो मार्ग उभारण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे एमएमआरडीएला आदेश दिले आहेत.


श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर भेट घेऊन डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी तळोजा-डोंबिवली-कल्याण असा मेट्रो मार्ग उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी देखील तात्काळ प्रतिसाद देत या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहेत. कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रोसोबतच हा प्रकल्पही हाती घेण्यात येईल. अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे.

तसेच महापेपर्यंत येणारी मेट्रो शिळफाट्यापर्यंत आणण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.  कल्याण-शीळ-तळोजा आणि महापे-शीळ मेट्रो लिंकमुळे शिळफाटा हे मेट्रोचे जंक्शन बनणार आहे.

एमएमआरडीए प्रदेशातील मेट्रो प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन देखील स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग मोकळा, मेट्रो पाचला मंजुरी