मुंबई उच्च न्यायालयाची या ठिकाणी आंदोलनाला परवानगी नसताना हे आंदोलन सुरू होते. तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण, या ठिकाणी नाही. त्यामुळे आंदोलन स्थलांतरित करण्याची विनंती पोलिसांकडून विद्यार्थी संघटनांना करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी संघटनांनी याला नकार देत आंदोलन सुरुच ठेवले होते. परिणामी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आझाद मैदानात स्थलांतरित केलं. तरीही काही विद्यार्थी गेट वे ऑफ इंडियाच्या आसपास जमा झाली होती. आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
म्हणून आंदोलन स्थलांतरित केलं -
या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्ही इथं आंदोलन करू नका, असं आंदोलकांना वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते म्हणून आम्ही त्यांना आझाद मैदानात हलवल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, आंदोलकांना आम्ही ताब्यात घेतलं नसून त्यांना स्थलांतरित केल्याची माहिती पोलीसांनी दिली. आझाद मैदानात आंदोलन करण्याची कायदेशीर परवानगी असून त्याठिकाणी सर्व सुधिवा उपलब्ध असल्याचे पोलीसांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी)रात्री मास्कधारी हल्लेखोरांनी हैदोस घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. रक्ताने माखलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू होतं.
काय घडलं रविवारच्या रात्री -
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला रुमाल बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या.
संबंधित बातमी :
JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?
JNU Attack : मोदी-शाहांना जे हवं तेच घडतयं : शिवसेना
JNU Violence | जेएनयूतील हल्ला पाहून 26/11ची आठवण झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद | ABP Majha