मुंबई : आपल्या वेगळ्या स्टाईलबद्दल प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आज विधीमंडळ परिसरात वेगळं रुप बघायला मिळालं. चिक्की घोटाळ्याच्या निषेधार्थ चिक्की खाऊन आंदोलन करणाऱ्या आव्हाडांनी आज गाजर खाव आंदोलन केलं.
आज अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवन परिसरात सरकार विरोधात जोरदार घोषणा केली. सरकारनं शेतकरी आणि सामान्यांना गाजर दाखवली, अशी टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात येत होती केली. पण आपल्या स्टाईलबद्दल प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गाजर खात सरकारचा विरोध केला.
यापूर्वीही चिक्की घोटाळ्यात महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंविरोधात आंदोलन करताना आव्हाडांनी चिक्की खाली होती. त्यांचं त्यावेळी चिक्की खाण्याची पद्धत पाहून अनेकांनी टीका केली होती. पण आज त्यांचं दुसरं रुपही बघायला मिळालं.
संबंधित बातम्या
‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो
Maha Budget 2017: महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प
कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, मात्र सबुरीनं घ्या : मुख्यमंत्री
Maha Budget 2017: काय स्वस्त, काय महाग?