Jitendra Awhad Latest Update : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 2 दिवसांपूर्वी ठाण्यात जाहीर सभेत ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.  त्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, मात्र काल आव्हाड यांनी पुन्हा सांगितले की ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. इतिहास कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे आज त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येतोय, 2 बस भरून पुण्यातून माणसे येणार आहेत असे आव्हाड यांनीच ट्वीट करून सांगितले आहे, त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे,


ओबीसी बाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोर्चा येणार असल्याचे केले होते ट्वीट केले आहे.  मागील वेळेस झालेला राडा पाहून पोलीस आधीपासून सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. एक क्यू आर टी टीम आणि सिटी पोलीस तैनात करण्यात आले असून 100 पोलीस सध्या बंदोबस्तात आहेत. जितेंद्र आव्हाड सध्या घरी नाहीत मात्र दुपारपर्यंत पुन्हा घरी येणार आहेत, अशी माहिती आहे. दरम्यान सध्या पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आव्हाड यांच्या घराबाहेर जमायला सुरुवात झाल्याने पोलिसा अडवत आहेत. मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, यात महिला आणि पुरुष असे दोन्ही कार्यकर्ते आहेत.






जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा....... जय भीम! असं आव्हाडांनी म्हटलं आहे. 


काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड


मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी (OBC Reservation) होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC मैदानात लढायला नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचंच नसतं. कारण ओबीसींवर ब्राह्माण्य वादाचा पगडा बसला आहे. पण त्यांना हे माहिती नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात. त्यामुळे OBC वर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले होते.   ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित, "सन्मान सावित्रीच्या लेकींचा" या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "आता आरक्षणाच्या निमित्ताने का होईना ओबीसी पुढे येत आहेत. पण नुसतं पुढं येऊन आणि घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागेल. सरकारशी दोन हात करावे लागतील. आज ओबीसी समाजाची 50 टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. तरीही हा महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हे लक्षात घ्यायला हवं". 



Jitendra Awhad on OBC : जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढण्यासाठी मैदानात नव्हते : जितेंद्र आव्हाड



महत्वाच्या बातम्या