मुंबई: शिवसेना-भाजपच्या वाक्-युद्धात आता राष्ट्रवादीनंही उडी घेत सेनेला खुलं आव्हान दिलं आहे. 'शिवसेनेला भाजपच्या भूमिकेवर आक्षेप असतील, तर उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर पडावं., राष्ट्रवादी मध्यावर्ती निवडणुकांसाठी तयार आहे.' असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

 


 

'उद्धव ठाकरे यांनी असरानी नाही तर शोले सिनेमातील ठाकूर व्हावं'असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. दरम्यान सेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीनंही उडी घेतली आहे.

 



 

मागील काही दिवसांपासून शोले सिनेमाचा दाखला देत राज्यातील राजकारण बरंच तापलं आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या याच वक्तव्याला राष्ट्रवादीनं उत्तर दिलं आहे.