पोलिस अधीक्षकांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देतना आंबेडकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. पोलिस अधीक्षकांच्या रिपोर्टमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं आहेत. मात्र, त्यांना वाचवण्याचं काम सरकारमधील मंत्रीच करत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. या आरोपवार जयंत पाटील यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना प्रकाश आंबेडकरांनीच वाचवल्याचा दावा केला.
कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसआयटीची मागणी केली होती. त्यानंतर 48 तासांच्या आत केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले. यावर राज्यातील नेत्यांकडून संशय वक्त केला जात आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
कोरेगाव भीमा दंगल हे तत्कालीन सरकारचं षडयंत्र, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरेगाव भीमा दंगल हे तत्कालीन सरकारचं षडयंत्र - पवार
कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धीजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेलं षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहलं आहे. त्यात ते लिहतात.. "पोलिस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या याची खोलात जाऊन चौकशी आवश्यकता आहे. कोरेगाव भीमा दंगलीला एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामधील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरुन कारवाई करण्यात आली. कारवाई झाली त्यात ही बुद्धीजीवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. म्हणून याप्रकरणी एसआयटी नेमावी," असं शरद पवार यांनी पत्रात लिहिलं आहे.
Anil Deshmukh | एल्गार परिषदेचा तपास एनआयकडे देणं घटनाबाह्य; गृहमंत्री अनील देशमुख यांची टीका | ABP Majha