मुंबई : कुर्ला पश्चिमेतील एस. जी. बर्वे मार्गावर असलेल्या मेहता इमारतीला भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्याल अग्निशमन दलाला अखेर यश आलं आहे. आग लागल्यानंतर घटना स्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने 10 वाजल्यापासून आग शमवण्याचे काम सुरू केले. अखेरीस रात्री दीडच्या सुमारास आग नियंत्रणात आली, तर सव्वादोनच्या सुमारास आग पूर्णपणे शमवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Continues below advertisement

आग लागलेल्या इमारतीमधून स्फोटाचे मोठे आवाज येत असल्याने काही काळासाठी भीतीचे वातावरण पसरले होते. इमारतीमधून स्फोटाचे आवाज येत असल्याने रहिवाशांचे सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

पाहा व्हिडीओ : कुर्ल्यातील आग लागलेल्या इमारतीतून स्फोटाचे आवाज, भीतीचं वातावरण, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

Continues below advertisement

दरम्यान, कुर्ला येथील एस जी बर्वे मार्गावर असलेल्या पालिका एल विभाग च्या बाजूच्या मेहता इमारतीला भीषण आग लागली होती. घटना स्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या होत्या. त्यानंतर आगीचे तीव्र रूप पाहता आणखी चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. इमारतीमधून स्फोटाचे मोठे आवाज येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र त्यानंतर अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झालं आहे.

कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर असलेल्या पालिका एल विभागाच्या बाजूच्या मेहता इमारतीला भीषण आग लागली होती. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीमधून स्फोटाचे मोठे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.