मुंबई : मनसेकडून (MNS) आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सवामध्ये सलीम- जावेद या जोडीने हजेरी लावली. अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) घेतलेल्या मुलाखतीवर जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी भन्नाट उत्तरं दिली. 'शोले' चित्रपटातील शंकाराच्या मंदिरातील एका सीनवर देखील जावेद अख्तर यांनी भाष्य केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'शोलेमधील मंदिरातला तो सीन मी किंवा सलीमजी आता लिहू शकत नाही. कारण सध्या आपण मंदिरांबाबत इतके भावनिक झालो आहोत, की कोणतीही गोष्टीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात.' 


दरम्यान जावेद अख्तर यांनी रितेश देशमुख यांच्या प्रश्नांवर भन्नाट उत्तर दिली.  तर त्यांनी हिंदु धर्म आणि संस्कृतीचही कौतुक केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, हिंदुंचं मन विशाल असतं त्यामुळे ही संस्कृती तितकीच समृद्ध आहे. आम्ही हिंदूकडून जगण्याचं कौशल्य शिकलो आहोत, असं जावेद अख्तरांनी म्हटलं. 


जावेद अख्तरांनी नेमकं काय म्हटलं? 


अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रितेश देशमुख यांनी प्रश्न विचारला असता, जावेद अख्तर यांनी शोले चित्रपटातील एका सीनचा संदर्भ दिला. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'शोले चित्रपटामध्ये शंकराच्या मंदिरातील सीन मी किंवा सलीमजी आता नाही लिहू शकत. आता आम्ही तो सीन लिहला तर त्यावर बराच गोंधळ निर्माण होऊ शकतो. आज आम्ही ते काहीच करु शकत नाही. कारण लोकांच्या भावना लगेच दुखावल्या जाऊ शकतात. संजोग चित्रपटातील कृष्ण सुदामाचं संपूर्ण आयुष्य ओमप्रकाश यांनी चित्रपटांतील गाण्यांमधून दाखवलं होतं. पण आता आम्ही ते नाही करु शकत किंबहुना ते लोकं स्विकारण नाहीत.'


सलीम-जावेद यांनी सिनेमाचं दिग्दर्शन का केलं नाही?


या मुलाखतीदरम्यान रितेश देशमुख यांनी सलीम - जावेदच्या जोडीने सिनेमाचं दिग्दर्शन का केलं नाही, यावर बोलताना म्हटलं की, 'मी या क्षेत्रात दिग्दर्शक बनण्यासाठीच आलो होतो. पण अनेकांनी मला लेखक होण्याचाच सल्ला दिला. यामध्ये सलीमजींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी देखील मला पटकथा लेखकच होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यानंतर दिग्दर्शनाकडे मी वळलोच नाही.'


तर या मुलाखतीदरम्यान आम्हाला कधीच जास्त पैसे मिळाले नाहीत, असं देखील या जोडीने म्हटलं. त्याचप्रमाणे त्यांनी हल्लीच्या लेखकांना लिहिताना अभियन कमी करण्याचा सल्ला दिला. 



हेही वाचा : 


Javed Akhtar :  श्रीराम-सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाही तर, मनसेच्या दिपोत्सवात जावेद अख्तरांचं बेधडक वक्तव्य