मुंबई: आयकर विवरणपत्र अर्थात आयटी रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावर्षी वेळेत आयकर भरला नाही तर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी आयकर भरण्यास उशीर झाला तर दंडाची कोणतीही तरतूद नव्हती. यावर्षी आयकर कायद्यामध्ये 234 F हे कलम वाढवण्यात आलं आहे. यानुसार आज जर कर भरला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.


खरंतर दरवर्षी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जलै असते आणि दरवर्षी तरीख वाढवली जाते. त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने आयकर दात्यांना एक महिन्याचा अवधी वाढवून दिला आहे.

जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

दंडाचे नियम काय आहेत?

  1. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

  2. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.

  3. 5 लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.

  4. 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.


दंडाची नेमकी तरतूद काय आहे?

आयकर अधिनियम 1961 मध्ये कलम 234-F समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम 1 एप्रिल 2018 पासून लागू झाले आहे. यामध्ये नियोजित  मुदतीत आयकर न भरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स

आयटी रिटर्न कसं भरायचं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. मात्र आपण थोडी जरी माहिती घेतली, तरी आयटी रिटर्न भरणं किती सोपं आहे हे आपल्याला कळेल. आपण नवा मोबाईल घेतल्यानंतर त्यातील फंक्शन्स कसे ऑपरेट करायचे हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपण एकदा त्यामध्ये लक्ष घातलं की सगळं समजायला लागतं, तसंच आयटी रिटर्नच्या बाबतीतही लागू आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स इथे क्लिक करा.

संबंधित बातम्या 

करदात्यांना दिलासा, आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली!  

आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स!