मुंबई :  रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलास आहे.  मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर (Platform Ticket Rate) कमी केले आहेत.  अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी फलाट तिकीटांचा (Platform Ticket)  दर वाढवला होता,  असे दर वाढवण्याचा विभागीय रेल्वे मॅनेजराचा अधिकार रेल्वे बोर्डाने (Indian Railway)  काढला.


 रेल्वेने मुंबईत रेल्वे (Mumbai Railway) प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket Price Hike) दरात वाढ केली होती. अनेक स्टेशनवर   तिकीट दर दहा रुपयांवरुन 30 ते 50 रुपये केले होते. या निर्णयला प्रवाशांनी विरोध केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. प्लाटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी 2015 साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते. रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती (Platform Ticket) वाढवता येणार नाहीत. यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीमुळे स्टेशनवर उगाचच येणाऱ्यांची संख्या घटेल, असा विश्वास रेल्वेला होता. यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर  50 रुपये दर केले होते. 


प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यामागे विशेष कारण  चेन पुलिंगच्या (Chain Pulling)  घटना  देखील होते. एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक (Railway Station) परिसरात अलार्म चेन (Alarm Chain) पुलिंगच्या  घटना घडल्या. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे  अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. शिवाय इतर प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी सीएसएमटी (CSMT), मुंबई सेंट्रल (Mumbai Central), दादर (Dadar), बोरीवली (Borivali), वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) , वापी,  ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), पनवेल (Panvel)  वलसाड, उधना आणि सुरत येथील प्लॅटफॉर्म तिकिटच्य दरात 50 रूपये वाढ करण्यात आली होती. दक्षिण रेल्वेने देखील दरवाढ केली होती.  


संबंधित बातम्या :