Indian Railways Rules : तुम्ही रेल्वेने (Indian Railway) प्रवास करणार आहात, पण तुम्हाला तिकीट मिळत नाही? आता तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला कधी अचानक प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर आता तुम्ही विना आरक्षण प्रवास करू शकता. यापूर्वी, केवळ तत्काळ तिकीट बुकिंग नियमांचा पर्याय होता. पण त्यातही तिकीट मिळेल की नाही? याची खात्री नसायची. अशा परिस्थितीत रेल्वेचा एक खास नियम जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता या सुविधेअंतर्गत तुम्ही आरक्षणाशिवाय (Reservation) प्रवास करू शकता.


प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास, रेल्वे नियम जाणून घ्या


रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमचे आरक्षण (Reservation) नसेल आणि तुम्हाला रेल्वेने तात्काळ जायचे असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता. तिकीट तपासनीसकडे जाऊन तुम्ही अगदी सहज तिकीट मिळवू शकता. हा नियम (Indian Railway Rules) रेल्वेनेच बनवला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच TTE शी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर TTE तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत तिकीट तयार करेल. एवढेच नाही तर तुम्ही TTE ला कार्ड पेमेंट देखील करू शकता.


जागा रिकामी नसली तरी 'हा' पर्याय उपलब्ध


रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास, TTE तुम्हाला राखीव सीट देण्यास नकार देऊ शकतो. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंडासह, प्रवासाचे एकूण भाडे भरून तिकीट काढावे. 


प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत


प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. त्यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे. भाडे आकारताना,  जिथे जायचं आहे ते स्थानक मानले जाईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच वर्गाचे भाडे देखील द्यावे लागेल ज्यामध्ये तुम्ही प्रवास करणार आहात.


तुमची ट्रेन कोणत्याही कारणाने चुकली तर...


जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणाने चुकली तर TTE तुमची सीट पुढील दोन स्टेशनपर्यंत कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजेच पुढील दोन स्थानकांवर तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचून तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा, दोन स्टेशनांनंतर, टीटीई आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशाला जागा देऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे दोन स्टेशनचा पर्याय आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी! काँग्रेसचे 22 आमदार फुटणार, फडणवीस यांच्याकडून तयारी; ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट