ठाणे : मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन आज 164 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली धावली होती. भारतीय रेल्वेचा प्रतिकात्मक वाढदिवस ठाण्यात साजरा करण्यात आला आहे.
आज 164 वर्षांनंतर भारतीय रेल्वेचा व्याप अनेकपटींनी वाढला आहे. यात मुंबईतील रेल्वेचा मोठा सहभाग आहे. रेल्वेच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ठाणे रेल्वे प्रवाशी संघटनांनी एकत्र येवून स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वेचा 5 किलोंचा प्रतिकात्मक केक कापला.
1853 साली मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु झाली होती. 164 वर्षांनंतर रेल्वेचा व्याप वाढला आहे, सोबतच रेल्वेप्रवाशांच्या समस्याही वाढल्या आहेत. मात्र रेल्वेकडून समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजनाही आखल्या गेल्या आहेत.