मुंबई : मागील वर्षी कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येत निवासी डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून कोविड योद्धा म्हणून काम केले. मात्र, मुंबईत काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेली कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे बीएमसी अंतर्गत येणाऱ्या रुग्णलयात उपचारासाठी येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बीएमसीने आपल्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णलयातील खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचा मार्डचे म्हणणे आहे. ते पाहता मार्डकडून मुंबई महापालिका रुग्णलयात खाटांची समान विभागणी करून खाटांची संख्या वाढवावी आणि कामाचे नियोजन सुद्धा योग्य पद्धतीने करून निवासी डॉक्टरांचा भार कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


कडक निर्बंध की लॅाकडाऊन? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता


सोबतच रुग्णलयातील नॉन कोविड वर्क व रुटीन रुग्णसेवा या सुद्धा सुरू ठेवाव्यात जेणेकरून निवासी डॉक्टरांना वैद्यकीय शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमात अनुभव घेता येईल. 'कोविड वॉर्डमध्ये महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर तज्ज्ञ डॉक्टर्स यांना सुद्धा कोविड ड्युटीसाठी हातभार लावण्यास सांगून कामाची विभागणी केली तर निवासी डॉक्टरांना शैक्षणिक अभ्यासक्रम सोबतच कोविड ड्युटीचे काम करता येईल व भार कमी होईल', असं मत केईएम मार्ड अध्यक्ष डॉ.अरुण घुले यांनी मांडले आहे. त्यामुळे मुंबईतील मार्ड संघटनेच्या या मागणीकडे बीएसमी प्रशासनाने यबाबत तातडीने विचार करावा, अशी विनंती केली आहे.


Maharashtra Corona Cases Update | राज्यात आज कोरोना रुग्णवाढीला ब्रेक; तरीही आकडा मोठाच


सध्याच्या स्थितीत मुंबईत करोनाची रुग्णसंख्या जरी दिवसाला 3 हजारांचा टप्पा पार करत असली तरी 40 टक्के महापालिका रुग्णलयातील खाटा या उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर येणाऱ्या काही दिवसात जर कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही, तर नक्कीच रुग्णसेवेवर त्याचा भार पडणार आहे, त्यामुळे याबाबतचा नियोजन करणे प्रशासनाला गरजेचे असणार आहे.