मुंबई : बृहन्मुंबई निम्नस्तर मराठी शिक्षक संघटना अभ्यास मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठी भाषा पुस्तकात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची चुकीची जन्मतारीख छापल्याने नवा वाद होण्याची चिन्ह आहेत. हा प्रकार सहावीतील एका विद्यार्थ्याने निदर्शनास आणून दिला.

यंदा डॉ. आंबेडकरांचं 125 व्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं होत असताना त्यांची जन्मतारीख 14 एप्रिलऐवजी 4 एप्रिल प्रकाशित करुन विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न समिती करत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे.



प्रकाशित आणि वितरित केलेली लाखो पुस्तकं रद्द करुन अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुमन कुबडे आणि त्यांच्या कार्यकारी मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात आज घाटकोपरमधील पंतनगर पोलिस स्थानकात निवेदन देण्यात आलं. या मंडळावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा मुंबई काँग्रेसने दिला आहे.