I-T Raids on Pushparaj Jain: पीयूष जैनच्या कानपूर आणि कन्नौजमधील घरातून कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज उर्फ ​​पम्मी जैन यांच्या घरावर आयकर आणि जीएसटी पथकांनी छापे टाकले आहेत. शुक्रवारी पहाटे आमदार पुष्पराज जैन यांच्या अनेक ठिकाणी आयकर आणि जीएसटी पथक दाखल झाले आहेत. पुष्पराज यांच्या कन्नौजच्या घरासह त्यांच्या नोएडा, कानपूर, हाथरस आणि मुंबईसह अनेक ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे 150 अधिकारी पुष्पराज यांच्या 50 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत. छाप्यात काय सापडले? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, टॅक्स चोरीच्या आरोपावरून हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पुष्पराज जैन यांच्या व्यतिरिक्त आयकर अधिकाऱ्यांनी कन्नोजमधील आणखी एका परफ्यूम व्यापारी मोहम्मद याकूब यांच्याही ठिकाणी छापा टाकत आहेत. 


पुष्पराज जैन प्रकरणात मुंबईमध्ये आयकर विभागाचे धाड सत्र सुरू आहे. मुंबई मध्ये एकूण 14 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी छापा टाकला आहे. या मध्ये 8 व्यवसायिक आणि 6 निवासी ठिकांणाचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, पुष्पराज यांच्या मुंबई येथील चार बॅंकेच्या खात्यांची चौकशी केली जात आहे. त्यांचे हे चारही खाते एसबीआय (बोरीवली) येथील आहेत. एसबीआय ही सरकारी बँक आहे. याव्यतिरिक्त एक प्रायव्हेट बँक आणि एसबीआय (कन्नोज) येथे ब्रँचमध्ये पम्मी जैन यांच्याशी संबंधित एक चालू खातं आणि चार बचत खात्यांसह एकूण सहा खात्यांची चौकशी केली जात आहे. 


दरम्यान, पियुष जैन यांच्यावरील छापेमारीवरून गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू होती. पियुष जैन यांच्या छाप्यांचा समाजवादी पक्षाशी संबंध जोडण्यात आला होता. यावर समाजवादी पक्षातील नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. पियुष जैन आणि समाजवादी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं पक्षातील नेत्यांकडून सांगितलं जातंय. महत्वाचं म्हणजे, कनौज येथे पुष्पराज जैन आणि पीयूष जैन यांचं घर जवळच असल्याची माहिती मिळत आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


MARD Doctors Strike: कोरोनाचं संकट वाढतंय अन् डॉक्टर संपावर! मार्ड डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप
Mumbai: पुन्हा लॉकडाऊन? मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, आज 3671 नव्या रुग्णांची नोंद