Share Market education in BMC School : मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकरता आर्थिक साक्षरता मिशन राबवले जाणार आहे. 8 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आता शेअर बाजाराचे धडे दिले जाणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने अभ्यासक्रम तयार केला आहे. याच संदर्भात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिका शिक्षण विभाग यांच्यात अर्थविषयक सर्वसमावेशक सामंजस्य करार करण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात येत आहे. यावेळी मुंबई महापालिकेचे शिक्षक आणि काही विद्यार्थीही उपस्थित आहेत.
आर्थिक साक्षरतेचा पाठ सुरु करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका- आदित्य ठाकरे
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, काही दिवसांत मुंबई महापालिका शाळेत अॅस्ट्रोनॉमी लॅब आणणार आहोत. आर्थिक साक्षरतेचा पाठ सुरु करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. बीएसई हे एक पर्यटनाचं चांगलं स्थळ आहे. न्यूयॉर्कच्या धर्तीवर हॉर्निमन सर्कलला जिथे सुरुवातीला स्टॉक एक्चेंज सुरु झालं तिथेही पर्यटकांना जाता येईल, असं ते म्हणाले. राजकीय लोकांना आयटीची नोटीस आल्यावर कळायला लागतं फायनान्शिअल मॅनेजमेंट म्हणजे काय असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज बीएसई आणिबीएमसीचा सामंजस्य करार झाला आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे जून महिन्यापासून अभ्यासक्रमातून दिले जाणार आहेत. पुढची पिढी घडवायची असेल तर आर्थिक साक्षरता आणणे गरजेचे आहे. 8 वी, 9 वीच्या विद्यार्थ्यांकरता विशेष अभ्यासक्रम आणि 6 वी 7 च्या विद्यार्थ्यांना स्टॉक एक्सचेंजचे गेम, बीएसईची ओळख करुन दिली जाणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या: