मुंबई : विरारच्या मांडवी परिक्षेत्रात नर जातीच्या बिबट्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. 5 ते 6 वर्षांचा, साडे सात फूट लांबीचा हा बिबट्या आहे. मांडवीच्या भामटपाडा येथील एका शेतात सकाळी दहा वाजता हा बिबट्या मृतावस्थेत मिळून आला आहे. परवा संध्याकाळी सुभाष पाटील या वन कर्मचाऱ्याला या बिबट्याचे जीवंत दर्शन झालं होतं.
बिबट्या मानवी वस्तीत आढळल्याने मांडवी वन विभागाने बिबट्याच्या रेस्क्यूसाठी ठाण्याची रेस्क्यू टिमला बोलावलं होतं. तसेच काल मांडवीचा बाजार ही भरणार होता. त्यामुळे खबरदारी म्हणून मांडवी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर बिबट्या दिसल्या ठिकाणी पहारा ठेवला होता.
सकाळी ठाण्याची वन विभागाची रेस्क्यू टीम आपल्या वाहनासह या बिबट्याला मानवी वस्तीतून पकडण्यासाठी आली होती. मात्र त्या टिमला बिबट्या हा संशयास्पद मृतावस्थेत आढळून आला. सध्या वन विभागाने राष्ट्रीय गांधी उद्यानात बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानांतर बिबट्याच मृत्यूच नेमकं कारण समजू शकेल. बिबट्याला कुठल्यातरी वाहनानं धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, पकडण्यासाठी आली होती रेस्क्यू टीम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2018 08:56 AM (IST)
बिबट्या मानवी वस्तीत आढळल्याने मांडवी वन विभागाने बिबट्याच्या रेस्क्यूसाठी ठाण्याची रेस्क्यू टिमला बोलावलं होतं. तसेच मांडवीचा बाजार ही भरणार होता. त्यामुळे खबरदारी म्हणून मांडवी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर बिबट्या दिसल्या ठिकाणी पहारा ठेवला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -