मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने (BJP) मुंबईमधील (Mumbai) सहापैकी पाच जागांवर दावा ठोकताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुंबईतील जागांमधून बाजूला केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला अवघी एक जागा वाट्याला येण्याची शक्यता आहे. उर्वरित पाच जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात असतील, अशी शक्यता आहे. पहिल्या यादीत भाजपने मुंबईतील दोन उमेदवारांची घोषणा करताना दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत त्याठिकाणी पियुष गोयल आणि मिहीर कोटेचा यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवलं आहे. 


दुसरीकडे, दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या नावाची चर्च आहे. मात्र, आता दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे हा बालेकिला भाजपला देण्यास शिवसैनिकांकडून कडाडून विरोध होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांनी पत्र लिहून या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा उमेदवार उतरवावा अशी मागणी केली आहे. 


दक्षिण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून राहुल नार्वेकरांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईमधील 200 ते 300 कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्या करून पत्र पाठवलं आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये यापूर्वीच रस्सीखेच सुरू असून शिवसेना शिंदे गटाकडील खासदारांना तिकीट देण्यासाठी भाजपकडून शासन ताब्यात केली जात आहे मत यामध्ये काही पाच ते सहा खासदारांची उमेदवारी बदलण्याची मागणी शिंदे गटाकडे करण्यात आली आहे. 


ठाणे आणि सिंधुदुर्गवरूनही भाजप आणि शिंदे गटांमध्ये जोरदार रस्सीखेच


दुसरीकडे ठाणे आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरूनही भाजप आणि शिंदे गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. त्यामुळे आता या वादात आता दक्षिण मुंबईच्या जागेची सुद्धा भर पडली आहे. त्यामुळे शिंदे काय निर्णय घेणार याकडे आता शिवसैनिकांचे लक्ष असेल. 


शिवसैनिकांनी काय म्हटलं आहे पत्रात?


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 


आदरणीय साहेब आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे तमाम हिंदुस्थानाचे स्वप्न आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते यासाठी दिवसरात्र काम करून हे स्वप्न साकार करू, पण हे करत असताना आम्ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अपेक्षित करतो. कारण हा मतदारसंघ मूळ शिवसेनेचा आहे. या मतदारसंघात आतापर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह चालत आलं आहे. या लोकसभा मतदारसंघात कट्टर शिवसैनिकांच्या फौजा आहेत. 2014 आणि 2019 साली या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जिंकत आला आहे. 


1989, 1991 आणि 1998 साली दिवंगत नेते मुरली देवरा व त्यांच्यानंतर 2014 आणि 2009 सालापासून खासदार मिलिंद देवर यांचं वर्चस्व राहिला आहे. आता मिलिंद देवर शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे आपल्याला लाखोंचे मताधिक्य देखील मिळू शकते. दक्षिण मुंबईतल्या घराघरात धनुष्यबाण पोहोचला आहे. कट्टर सैनिक या दक्षिण मुंबईतून उमेदवार असेल, तर पक्षाची दक्षिण मुंबईतील ताकद आणखी वाढेल. आपण शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहात. आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्हाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या