मुंबई : मुंबईत कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहेत. आज मुबंईत 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6082 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 41 हजार 102 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 6 लाख 23 हजार 80 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 


मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर 170 वर गेला आहे. काल मुंबईत  1794 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 3580 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्च देण्यात आला होता. 


मुंबईत खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरणास परवानगी, बीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जारी


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपनी आता मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्राशी करार करू शकतील. त्यासाठी पालिकेने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांना स्वत: लस खरेदी कराव्या लागतील. त्यानतंर लसीकरण शिबीर घ्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी लसीकरण शिबीर भरवता येतील. मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्रे आणि गृहनिर्माण संस्था / कंपनी या दोघांना संयुक्तपणे डोसची किंमत ठरवावी लागेल. या खाजगी कंपन्या / गृहनिर्माण संस्था आणि खाजगी रुग्णालयात समन्वय साधणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे नोडल अधिकारी कार्यालयांमधील किंवा गृहनिर्माण संस्थांमधील लसीकरणाच्या सर्व बाबींवर देखरेख व सुलभता राखण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी, साठा, यावेळी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करेल.


नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर


नवी मुंबईत कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्यात दीड हजारपर्यंत पोहचलेली दिवसभरातील कोरोना रुग्णसंख्या आता थेट दीडशेच्या आत आली आहे. महानगर पालिका प्रशासनाने केलेले ट्रेसिंग, एपीएमसीवर लावलेले निर्बंध आणि लॉकडाऊन या सर्वांचा परिणामामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे. आज नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या गेल्या 10 दिवसांत कमी होऊन ती फक्त 132 वर आली आहे.