मुंबई : इजिप्तच्या इमान अहमदची जगातील सर्वाधिक वजनदार महिला ही ओळख आता पुसली जाणार आहे. कारण शस्त्रक्रियेसाठी मुंबईत दाखल झालेल्या इमानने शस्त्रक्रियेपूर्वीच तब्बल 100 किलो वजन कमी करण्यात यश मिळवलं आहे.
शस्त्रक्रियेसाठी इमान यांना भारतात येण्यास अडचण येत असल्याने काही दिवसांपूर्वी डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं होतं. स्वराज यांनीही तत्परता दाखवत यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानंतर ही माहिला प्रसिद्धीझोतात आली होती.
दरम्यान, इमान भारतात आल्या त्यावेळी त्यांचं वजन 498 किलो होतं. मात्र, शस्त्रकियेपूर्वीच औषधोपचाराद्वारे त्यांचं 120 किलो वजन कमी झालंय. इमान अहमद यांचे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मुफझ्झल लकडावाला यांनी ही माहिती दिलीय.