या प्रकरणात याआधी राज ठाकरे, उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांची चौकशी झाली आहे. कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात झालेल्या आर्थिक अफरातफरीनंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. ईडीने नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सरदेसाई आज बॅलार्ड पियर्सच्या ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यामुळे ईडीच्या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे प्रकरण?
काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.
उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.
उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या
- अशी झाली चौकशी राज ठाकरेंची चौकशी, दिल्लीहून ईडीचे विशेष संचालकही मुंबईत
- ईडी नोटीस प्रकरण, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची राज ठाकरेंच्या समर्थनार्थ आत्महत्या?
- Raj Thackeray | राज ठाकरेंना ईडीनं नोटीस बजावली, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
- ED Notice | ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, राज ठाकरेंंचं कार्यकर्त्यांना आवाहन
- राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवल्याचं विशेष वाटत नाही : संजय राऊत
- कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रमक