मुंबई: आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे.
मन्मथ म्हैसकर (वय 18) याने सकाळी सात वाजता आत्महत्या केली. मुंबईतील मलबार हिल परिसरातील नेपियन सी रोडवरील दरिया महल इमारतीवरुन उडी घेऊन त्याने जीवन संपवलं.
मिलिंद आणि मनिषा म्हैसकर दोघेही आयएस अधिकारी आहेत. त्यांना मन्मथ हा एकुलता एक मुलगा होता.
मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.
मन्मथ हा शिक्षण घेत होता. आज सकाळी मित्राला भेटायला जातोय, असं सांगून घराबाहेर गेला. मात्र त्याने थेट इमारतीवर जाऊन खाली उडी घेऊन जीव दिला.
मन्मथने आयुष्य का संपवलं याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे.