भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण, भांडुप शिवसेना उपशाखाप्रमुखांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2017 12:41 PM (IST)
भांडुपमधील प्रभाग क्रमांक 116 ची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. मात्र या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दररोज काही ना काही राडा होतच आहे.
मुंबई : राज्यात आणि केंद्रात सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील विस्तव काही केल्या जाताना दिसत नाही. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप भांडुप शिवसेना उपशाखाप्रमुख शारदा सरोज यांनी केला आहे. भांडुपमधील प्रभाग क्रमांक 116 ची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. मात्र या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दररोज काही ना काही राडा होतच आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून घरी जात असताना, 3 ते 4 जणांनी हल्ला केला. हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप शारदा सरोज यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेत शारदा सरोज यांच्या डोक्याला दुखापत झाली असून सायनच्या टिळक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.