ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा आपला संपर्क झाल्याची कबुली त्याचा भाऊ इक्बाल कासकरने पोलिसांना दिली. दाऊदसोबत व्हिओआयपी कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याचं आपल्या व्यवसायांवर नेहमी लक्ष असंत, अशी माहिती इक्बालने दिली.
इक्बालने काल दाऊच्या पाकिस्तानमधल्या 3 घरांची माहिती पोलिसांना दिली. दारूचं व्यसन असल्यामुळे दाऊद आपल्याशी बोलत नसल्याचं इक्बालने पोलिसांना काल सांगितलं होतं. मात्र आज त्याने दाऊद संपर्कात असल्याचं सांगितलं. शिवाय दाऊद आजारी नसल्याची माहितीही त्यांने पोलिसांना दिली.
गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची कसून चौकशी केली जात आहे.
पाकिस्तानातील कराचीमध्ये दाऊद इब्राहिमची चार घरं आहेत. या माहितीसोबतच दाऊदशी शेवटचा संपर्क कधी झाला, हेही इक्बालने आयबीला सांगितलं. शिवाय दाऊदच्या कुटुंबाबाबतही त्याने आयबीला माहिती दिली. इक्बाल कासकरने दाऊदबाबत अनेक गोष्टी आयबीला सांगितल्या.
धक्कादायक म्हणजे, 2016 मध्ये ठाण्यातील दोन नगरसेवक माझ्याकडे जेवायला आले होते, असेही इक्बाल कासकराने आयबीला सांगितले.
इक्बाल कासकरची आयबीकडून अद्यापही चौकशी सुरु आहे. इक्बालकडून आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने अटक केली. पोलिसांनी इक्बालसह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संबंधित बातम्या
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत
अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं धडाक्यात कमबॅक
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल